व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

छळ होत असतानाही आनंदी राहा

छळ होत असतानाही आनंदी राहा

आपण येशूचे अनुयायी असल्यामुळे आपला छळ होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो. (योह १५:२०) छळ होत असताना आपल्याला त्रास होतो किंवा कधीकधी चिंता वाटते. पण जेव्हा आपण धीराने छळ सहन करतो तेव्हा अशा परिस्थितीतही आपण आनंदी राहू शकतो.—मत्त ५:१०-१२; १पेत्र २:१९, २०.

आपण आनंदी राहू शकतो . . . छळ होत असतानाही  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

बंधू बाजेनोव्ह यांच्या अनुभवातून तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टींच्या महत्त्वाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • दररोज बायबलचं वाचन करणं.

  • आपल्या भाऊबहिणींचा आधार. a

  • सतत प्रार्थना करणं.

  • राज्यगीतं गाणं.

  • इतरांशी आपल्या विश्‍वासाबद्दल बोलणं.

a जेलमध्ये असलेल्या भाऊबहिणींसाठी आपण त्यांचं नाव घेऊन प्रार्थना करू शकतो. पण शाखा कार्यालयाला त्यांना आपली पत्रं पाठवणं शक्य नाही.