व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

आजची कामं उद्यावर टाकायची सवय टाळा

आजची कामं उद्यावर टाकायची सवय टाळा

लगेच केली पाहिजेत अशी कामं लांबणीवर टाकायची काही जणांना सवय असते. पण येहू नक्कीच तसा नव्हता. यहोवाने जेव्हा अहाबच्या घराण्याचा नाश करायची कामगिरी त्याच्यावर सोपवली, तेव्हा त्याने लगेच कार्य केलं. (२रा ९:६, ७, १६) काही जण म्हणतात: “एखाद-दोन वर्षांत मी बाप्तिस्मा घेईन.” “दररोज बायबल वाचायला मी लवकरच सुरवात करणारेय.” “चांगली नोकरी मिळाल्याबरोबर मी पायनियर सेवेचा फॉर्म भरीन.” बायबल आपल्याला उपासनेच्या बाबतीत अशी मनोवृत्ती टाळायला मदत करतं.

खाली दिलेली वचनं आपल्याला आजची कामं उद्यावर टाकायची सवय टाळायला कशी मदत करू शकतात?