देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
त्याने धैर्याने, दृढनिश्चयाने आणि आवेशाने काम केलं
यहोवाने येहूला दुष्ट राजा अहाब याच्या घराण्याचा नाश करायची आज्ञा दिली होती (२रा ९:६, ७; टेहळणी बुरूज११ ११/१५ ३ ¶२)
यहोवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे येहूने लगेच कार्य केलं आणि त्याने यहोराम राजा (अहाबचा मुलगा) आणि ईजबेल राणी (अहाबची विधवा) यांना मृत्युदंड दिला (२रा ९:२२-२४, ३०-३३; टेहळणी बुरूज११ ११/१५ ४ ¶२-३; “‘अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल’—२रा ९:८” हा तक्ता पाहा)
येहूने धैर्य, दृढनिश्चय आणि आवेश दाखवून यहोवाने दिलेलं काम पूर्ण केलं (२रा १०:१७; टेहळणी बुरूज११ ११/१५ ५ ¶३-४)
स्वतःला विचारा, ‘मत्तय २८:१९, २० मधल्या आज्ञेप्रमाणे काम करण्यासाठी मला येहूचं अनुकरण कसं करता येईल?’