व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

आपल्या प्रार्थनांना यहोवा मौल्यवान समजतो

आपल्या प्रार्थनांना यहोवा मौल्यवान समजतो

मंदिरात नियमितपणे यहोवासमोर धूप जाळला जायचा. यहोवाच्या इच्छेप्रमाणे केलेल्या प्रार्थनासुद्धा त्या सुगंधी धूपासारख्या आहेत. (स्तो १४१:२) जेव्हा आपण प्रार्थनेत आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल वाटणारं प्रेम आणि कदर व्यक्‍त करतो, आपल्या चिंता आणि इच्छा त्याला सांगतो आणि त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी विनंती करतो, तेव्हा आपण दाखवतो की यहोवासोबतचं मैत्रीचं नातं आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. सभांमध्ये सर्वांच्या वतीने केल्या जाणाऱ्‍या प्रार्थना सहसा थोडक्यात केल्या जातात. आणि यहोवा या प्रार्थनांचीही कदर करतो. कारण त्या आपल्या उपासनेचा महत्त्वाचा भाग आहेत. पण, आपल्या वैयक्‍तिक प्रार्थनांमध्ये जेव्हा आपण यहोवासमोर आपलं मन मोकळं करून बराच वेळ त्याच्याशी बोलतो तेव्हा त्याला किती आनंद होत असेल!—नीत १५:८.

मी नेहमी यहोवाकडे प्रार्थना करतो  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • बंधू जॉन्सन यांनी कोणकोणत्या मार्गाने यहोवाची सेवा केली?

  • बंधू जॉन्सन कशा प्रकारे प्रार्थनेद्वारे यहोवावर विसंबून राहिले?

  • बंधू जॉन्सन यांच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?