देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
प्रार्थनेमुळे यहोवा मदत करायला प्रवृत्त झाला
यहोवाने हिज्कीयाला सांगितलं होतं की तो त्याच्या आजारातून बरा होणार नाही (२रा २०:१; यशायाह-१ अध्या. २९ ¶२३)
हिज्कीयाने आपला विश्वासूपणा आठवण्याची यहोवाला कळकळून विनंती केली (२रा २०:२, ३; टेहळणी बुरूज१७.०३ २१ ¶१६)
हिज्कीयाने केलेल्या प्रार्थनेमुळे यहोवा त्याला मदत करायला प्रवृत्त झाला (२रा २०:४-६; टेहळणी बुरूज०३ १०/१ ४ ¶१)
आपल्या प्रार्थनासुद्धा यहोवाला असं काहीतरी करायला प्रवृत्त करू शकतात जे कदाचित त्याने केलं नसतं. या अहवालामुळे तुम्हाला कशा प्रकारे यहोवाला प्रार्थना करत राहायचं प्रोत्साहन मिळतं?