व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

“अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल,”—२रा ९:८

“अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल,”—२रा ९:८

यहूदाचं राज्य

यहोशाफाट राजा आहे

सु. ९११ इ.स.पू.: यहोराम (यहोशाफाटचा मुलगा; अहाब आणि ईजबेलची मुलगी अथल्याचा हिचा पती) शासन करणारा एकमेव राजा बनतो

सु. ९०६ इ.स.पू.: अहज्या (अहाब आणि ईजबेलचा नातू) राजा बनतो

सु. ९०५ इ.स.पू.: अथल्या राजघराण्यातल्या सगळ्या वारसदारांना मारून टाकते आणि राजपद बळकावते. पण तिच्या नातूला म्हणजे यहोआशला महायाजक यहोयादाद्वारे वाचवलं जातं आणि तिच्यापासून लपवून ठेवलं जातं.—२रा ११:१-३

सु. ८९८ इ.स.पू.: यहोआश राजा बनतो. महायाजक यहोयादा राणी अथल्याला मृत्युदंड देतो.—२रा ११:४-१६

इस्राएलचं राज्य

सु. ९२० इ.स.पू.: अहज्या (अहाब आणि ईजबेलचा मुलगा) राजा बनतो

सु. ९१७ इ.स.पू.: यहोराम (अहाब आणि ईजबेलचा मुलगा) राजा बनतो

सु. ९०५ इ.स.पू.: येहू इस्राएलचा राजा यहोराम आणि त्याच्या भावांना ठार मारतो, तसंच यहोरामची आई ईजबेल आणि यहूदाचा राजा अहज्या आणि त्याच्या भावांनाही ठार मारतो—२रा ९:१४—१०:१७

सु. ९०४ इ.स.पू.: येहू राजा म्हणून राज्य करू लागतो