ख्रिस्ती जीवन
आपण आध्यात्मिक ध्येयं गाठायचा प्रयत्न का केला पाहिजे?
भाऊबहीण वेगवेगळी आध्यात्मिक ध्येयं गाठण्यासाठी प्रयत्न करतात. जसं की, पायनियर सेवा, बेथेल सेवा आणि राज्य सभागृहांचं बांधकाम. यासोबतच बांधव मंडळीत देखरेख करायची जबाबदारी मिळण्यासाठीसुद्धा प्रयत्न करतात. (१ती ३:१) पण याचा अर्थ असा होतो का की आपण मंडळीत महत्त्वाची व्यक्ती आहोत असं वाटावं म्हणून एखादी खास नेमणूक किंवा जबाबदारी मिळवायच्या मागे लागावं?
आध्यात्मिक ध्येयं गाठायचा प्रयत्न का करावा? (१ती ३:१) हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
आध्यात्मिक ध्येयं गाठायचा प्रयत्न करायची कोणती तीन कारणं आहेत, हे समजून घेण्यासाठी पुढे दिलेली वचनं आपल्याला कशी मदत करतात?