देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
एका दुष्ट आणि महत्त्वाकांक्षी स्त्रीला शेवटी शिक्षा मिळाली
अथल्याने राजघराण्यातल्या सगळ्या वारसदारांना मारून टाकलं, कारण तिला यहूदावर राज्य करायचं होतं (२रा ११:१; बायबलमधून शिकू या! पाठ ५३ ¶१-२; “‘अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल’—२रा ९:८” हा तक्ता पाहा)
पण यहोशेबाने यहोआशला, म्हणजेच राजघराण्याच्या एका वारसदाराला लपवून ठेवलं (२रा ११:२, ३)
महायाजक यहोयादा याने यहोआशचा राज्याभिषेक केला आणि दुष्ट अथल्याला मृत्युदंड दिला. कदाचित ती अहाबच्या घराण्यातली शेवटची व्यक्ती असावी (२रा ११:१२-१६; बायबलमधून शिकू या! पाठ ५३ ¶३-४)
यावर मनन करा: या अहवालातून, नीतिवचनं ११:२१ आणि उपदेशक ८:१२ १३ यांतले शब्द खरे आहेत हे कसं दिसून येतं?