ख्रिस्ती जीवन
आपण केलेली मेहनत यहोवा कधीही विसरणार नाही
कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं, की आपण इतरांसाठी जी मेहनत घेतो त्याची कोणीही कदर करत नाही आणि लोक ती लगेच विसरून जातात. पण यहोवासाठी आपण जी मेहनत घेतो त्याबद्दल काय? आपल्या कामाची कदर करणारा देव त्याच्या सेवेसाठी आपण घेतलेली मेहनत कधीही विसरत नाही. वयोमानामुळे किंवा तब्येत खालावल्यामुळे आपण पूर्वीसारखं काम करू शकत नसलो तरीसुद्धा तो कधीही आपल्याला एकटं सोडणार नाही.—इब्री ६:१०.
यहोवा कधीच विसरणार नाही हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
बंधू डेव्हिड हिब्शमन यांनी वेगवेगळ्या मार्गांनी यहोवाची सेवा करण्यात कशा प्रकारे मेहनत घेतली?
-
बंधू हिब्शमन यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यावर आणि वाढत्या वयामुळे त्यांना जास्त काम करणं शक्य नव्हतं, तेव्हासुद्धा यहोवा त्यांची मेहनत विसरला नाही असं का म्हणता येईल?
-
बंधू हिब्शमन यांना आपल्या जीवनात पूर्ण वेळेची सेवा करताना भरपूर आशीर्वाद मिळाले असं का म्हणता येईल?—नीत १०:२२