व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

“इतरांना देत राहा”

“इतरांना देत राहा”

येशूने म्हटलं की आपण जेव्हा उदारता दाखवतो तेव्हा इतरांनाही तसं करायची प्रेरणा मिळते. (लूक ६:३८) जेव्हा तुम्ही नेहमी इतरांना उदारता दाखवता तेव्हा ते पाहून भाऊबहिणींनाही दयाळू असण्याचं आणि उदारपणे वागायचं प्रोत्साहन मिळेल.

इतरांना आनंदाने मदत करणं हा आपल्या उपासनेचाच एक भाग आहे. ज्या भाऊबहिणींना मदतीची गरज आहे त्यांना आपण जेव्हा उदारपणे मदत करतो तेव्हा यहोवा ते पाहतो आणि आपल्याला त्याचं प्रतिफळ देतो.—नीत १९:१७.

तुमच्या उदार वृत्तीबद्दल आम्ही आभारी आहोत  हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • तुम्ही दिलेल्या दानाचा भाऊबहिणींना मदत करण्यासाठी कसा उपयोग केला जातो?

  • आपल्याला मोठं दान देणं शक्य असो किंवा नसो, आपण नेहमी उदारता का दाखवली पाहिजे?—“बहुतायत से पूरी की गयी घटी” हा jw.org/hi वरचा लेख पाहा