देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
त्यांच्यासोबत जितके आहेत, त्यापेक्षा जास्त आपल्यासोबत आहेत
अलीशा आणि त्याच्या सेवकाला शत्रूंनी घेरलं (२रा ६:१३, १४; बायबलमधून शिकू या! पाठ ५२ ¶१-२)
अलीशा शांत राहिला आणि त्याने त्याच्या सेवकाला धीर दिला (२रा ६:१५-१७; टेहळणी बुरूज१३ ८/१५ ३० ¶२; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)
यहोवाने चमत्कार करून अलीशा आणि त्याच्या सेवकाला वाचवलं (२रा ६:१८, १९; इन्साइट-१ ३४३ ¶१)
आपले विरोधक यहोवापेक्षा जास्त शक्तिशाली नाहीत. आज यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी स्वर्गदूतांचा वापर कसा करत आहे, हे जर आपल्याला स्वर्गात डोकावून पाहता आलं, तर तुम्हाला काय वाटतं आपल्याला काय दिसेल?