व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

साक्षीदारांचं चांगलं नाव टिकून राहण्यासाठी मी काय करू शकतो?

साक्षीदारांचं चांगलं नाव टिकून राहण्यासाठी मी काय करू शकतो?

यहोवाच्या साक्षीदारांचं वागणं-बोलणं कसं आहे याकडे लोकांचं लक्ष असतं. (१कर ४:९) म्हणून आपण स्वतःला विचारलं पाहिजे, की ‘माझ्या वागण्या-बोलण्यातून यहोवाचा गौरव होतो का?’ (१पेत्र २:१२) यहोवाच्या साक्षीदारांनी बऱ्‍याच वर्षांपासून चांगलं नाव कमवलं आहे. त्यावर कलंक लागेल असं काहीही करायची आपली इच्छा नाही.​—उप १०:१.

खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये एका ख्रिस्ती व्यक्‍तीने काय केलं पाहिजे आणि कोणतं बायबल तत्त्व तिला मदत करू शकेल ते लिहा:

  • साक्षीदार नसलेली व्यक्‍ती आपला अपमान करते तेव्हा . . .

  • आपले कपडे, गाडी आणि घर स्वच्छ नसतं तेव्हा . . .

  • एखादा स्थानिक कायदा चुकीचा वाटतो किंवा पाळायला कठीण जातो तेव्हा . . .

आपलं चांगलं नाव टिकून राहावं म्हणून लेखन विभागात संशोधन करणारे भाऊबहीण काय करतात?

आम्ही सत्याबद्दल इतरांच्या मनात प्रेम आणि आदर वाढवतो  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या:

संघटना अचूक माहिती देण्यासाठी जी मेहनत घेते, त्याबद्दल कोणती गोष्ट तुम्हाला विशेष वाटते?