देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
धनसंपत्तीमुळे कोणी नीतिमान ठरत नाही
सोफरने दावा केला की देव दुष्ट व्यक्तीची धनसंपत्ती काढून घेतो. असं म्हणून, ईयोब एक पापी व्यक्ती आहे असं त्याला सूचवायचं होतं (ईयो २०:५, १०, १५)
ईयोबने उत्तर देत त्याला म्हटलं, की मग ‘दुष्ट लोकांची भरभराट का होते?’ (ईयो २१:७-९)
येशूच्या उदाहरणातून दिसून येतं की नीतिमान व्यक्तीकडे धनसंपत्ती असेलच असं नाही (लूक ९:५८)
यावर मनन करा: गरीब असो किंवा श्रीमंत, देवाच्या सेवकांसाठी कोणती गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची असली पाहिजे?—लूक १२:२१; टेहळणी बुरूज०७ ८/१ ३० ¶१२.