व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

११-१७ नोव्हेंबर

स्तोत्र १०६

११-१७ नोव्हेंबर

गीत ३२ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “आपल्या तारण करणाऱ्‍या देवाला ते विसरले”

(१० मि.)

जेव्हा इस्राएली लोक घाबरले तेव्हा त्यांनी यहोवाविरुद्ध बंड केलं (निर्ग १४:११, १२; स्तो १०६:७-९)

इस्राएली लोक भुकेने आणि तहानेने व्याकूळ झाले तेव्हा त्यांनी यहोवाविरुद्ध कुरकुर केली (निर्ग १५:२४; १६:३, ८; १७:२, ३; स्तो १०६:१३, १४)

इस्राएली लोकांना चिंता वाटू लागली तेव्हा त्यांनी मूर्तींची उपासना केली (निर्ग ३२:१; स्तो १०६:१९-२१; टेहळणी बुरूज१८.०७ २० ¶१३)

यावर मनन करा: समस्यांचा सामना करताना यहोवाने आधी कोणत्या काही विशिष्ट मार्गांनी मदत केली होती यावर विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १०६:३६, ३७—मूर्तींची उपासना करण्याचा, दुष्ट स्वर्गदूतांना बळी देण्याशी कसा संबंध आहे? (टेहळणी बुरूज०६ ८/१ ६ ¶९)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. सोप्या पद्धतीने शिकवा—येशूने काय केलं?

(७ मि.) चर्चा. हा व्हिडिओ दाखवा, आणि त्यानंतर शिष्य बनवा धडा ११ मुद्दे १-२ वर चर्चा करा.

५. सोप्या पद्धतीने शिकवा—येशूने केलं तसं करा

ख्रिस्ती जीवन

गीत ७२

६. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

७. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७७ आणि प्रार्थना