१८-२४ नोव्हेंबर
स्तोत्रं १०७-१०८
गीत ७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. “यहोवाचे आभार माना, कारण तो चांगला आहे”
(१० मि.)
यहोवाने जशी बाबेलमधून इस्राएली लोकांची सुटका केली, त्याचप्रमाणे सैतानाच्या जगातून त्याने आपली सुटका केली आहे (स्तो १०७:१, २; कल १:१३, १४)
यहोवाबद्दल कदर असल्यामुळे मंडळीत त्याची स्तुती करायची प्रेरणा आपल्याला मिळते (स्तो १०७:३१, ३२; टेहळणी बुरूज०७ ५/१ ८ ¶२)
यहोवाने प्रेमाने केलेल्या कार्यांवर काळजीपूर्वक विचार केल्यामुळे त्याच्याबद्दल आपल्या मनात असलेली कदर वाढते (स्तो १०७:४३; टेहळणी बुरूज१५ १/१५ ९ ¶४)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
-
स्तो १०८:९—मवाब देवाचं “पाय धुण्याचं पात्र” आहे असं का म्हणण्यात आलंय? (इन्साइट-२ ४२० ¶४)
-
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो १०७:१-२८ (शिकवणे अभ्यास ५)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ४)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्तीला बायबल अभ्यासाबद्दल सांगा आणि बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)
६. भाषण
(५ मि.) तरुण लोक विचारतात ९०—विषय: मला निराश करणारे विचार कसे टाळता येतील? (शिकवणे अभ्यास १४)
गीत ४६
७. आपण गीत गाऊन यहोवाचे आभार मानतो
(१५ मि.) चर्चा.
तांबड्या समुद्राजवळ यहोवाने घाबरलेल्या इस्राएली लोकांना शक्तिशाली इजिप्तच्या सैन्यापासून सोडवलं. तेव्हा त्यांनी यहोवाचे आभार मानायला उत्साहाने गीत गायलं. (निर्ग १५:१-१९) हे नवीन गीत गाण्यासाठी पुरुषांनी पुढाकार घेतला. (निर्ग १५:२१) येशू आणि पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनीसुद्धा देवाच्या स्तुतीसाठी गीतं गायली. (मत्त २६:३०; कल ३:१६) आपणसुद्धा मंडळीच्या सभांमध्ये, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये गीतं गाऊन यहोवाबद्दल असलेली कदर व्यक्त करतो. जसं की, आत्ताच आपण “यहोवा, तुझे आभार मानतो,” हे गीत गायलं. हे गीत १९६६ पासून आपल्या सभांमध्ये गायलं जातंय.
काही संस्कृतींमध्ये पुरुषांना सर्वांसमोर गायला अवघडल्यासारखं वाटतं. तसंच, ‘आपला आवाज चांगला नाही,’ असं काहींना वाटत असल्यामुळे ते गात नाहीत. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की सभांमध्ये गीत गाणं हा आपल्या उपासनेचा भाग आहे. यहोवाची संघटना, अतिशय सुंदर रीतीने रचलेली ही गीतं तयार करण्यासाठी आणि प्रत्येक सभेत गायला योग्य गीतं निवडण्यासाठी खूप मेहनत घेते. त्यामुळे आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दल असलेलं प्रेम आणि कदर व्यक्त करण्यासाठी इतर भाऊबहिणींसोबत मिळून ही गीतं नक्कीच गाऊ शकतो!
इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये—गीतांची देणगी, भाग २ हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:
-
१९४४ मध्ये कोणती महत्त्वाची घटना घडली?
-
सायबेरीयातल्या आपल्या भाऊबहिणींनी राज्यगीतं गाण्याविषयी त्यांच्या मनात कदर असल्याचं कसं दाखवून दिलं?
-
यहोवाच्या साक्षीदारांसाठी राज्यगीतं गाणं इतकं महत्त्वाचं का आहे?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. १८ ¶६-१५