व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२३-२९ डिसेंबर

स्तोत्र ११९:१२१-१७६

२३-२९ डिसेंबर

गीत ३१ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. आपण स्वतःहून दुःख ओढवून घ्यायचं कसं टाळू शकतो?

(१० मि.)

देवाच्या आज्ञांवर प्रेम करा (स्तो ११९:१२७; टेहळणी बुरूज१८.०६ १७ ¶५-६)

वाईट गोष्टींचा द्वेष करा (स्तो ११९:१२८; अभ्यास लेख माहितीपत्रक—१९९४ ३३ ¶१२)

यहोवाचं ऐका आणि ‘अनुभव नसलेल्यांकडून’ ज्या चुका होतात त्या टाळा (स्तो ११९:१३०, १३३; नीत २२:३)

स्वतःला विचारा, ‘यहोवाच्या आज्ञा पाळायला किंवा वाईट गोष्टींचा द्वेष करायला मला स्वतःमध्ये कोणत्या सुधारणा कराव्या लागतील?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो ११९:१६०—या वचनात सांगितल्याप्रमाणे आपल्याला कशाची खातरी असली पाहिजे? (टेहळणी बुरूज२३.०१ २ ¶२)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालकाला आवडतील असे विषय jw.org वर कसे शोधायचे ते सांगा. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)

६. शिष्य बनवण्यासाठी

(५ मि.) नियमितपणे सभेला न येणाऱ्‍या बायबल विद्यार्थ्याबरोबर चर्चा करा. (शिष्य बनवा धडा १२ मुद्दा ४)

ख्रिस्ती जीवन

गीत १२१

७. पैशांमुळे अनावश्‍यक दुःख ओढवून घेऊ नका

(१५ मि.) चर्चा.

जे पैशांच्या मागे लागतात ते “स्वतःला पुष्कळ दुःखांनी भोसकून” घेतात. (१ती ६:९, १०) आपण पैशावर प्रेम केलं आणि त्याच्याच मागे लागलो, तर आपल्याला दुःखांचा सामना करावा लागेल. त्यांपैकी काही म्हणजे:

  • यहोवासोबत आपल्याला एक घट्ट नातं जोडता येणार नाही.—मत्त ६:२४

  • आपण कधीच समाधानी होणार नाही.—उप ५:१०

  • खोटं बोलणं, चोरी करणं आणि विश्‍वासघात करणं यांसारख्या नैतिक रित्या चुकीच्या असलेल्या गोष्टींना आपण लगेच बळी पडू. (नीत २८:२०) त्यामुळे आपल्याला दोषीपणाच्या भावनेला तोंड द्यावं लागेल, आपलं नाव खराब होईल आणि आपण देवाची मर्जी गमावून बसू

इब्री लोकांना १३:५ वाचा आणि या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  •   पैशाबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगल्यामुळे आपण विनाकारण स्वतःवर दुःख ओढवून घ्यायचं टाळू शकतो? आणि असा दृष्टिकोन आपण का बाळगला पाहिजे?

कदाचित पैशावर आपलं प्रेम नसेल. पण आपण जर त्याचं योग्य नियोजन केलं नाही, तर आपण स्वतःवर अनावश्‍यक दुःख ओढवून घेऊ शकतो.

पैशांचा विचारपूर्वक वापर करा बोर्डवरचं कार्टून दाखवा. मग विचारा:

  •   आपण एक बजेट का बनवलं पाहिजे आणि ते कसं करता येईल?

  •   पैशांची थोडी बचत करणं का चांगलं आहे?

  •   आपण विनाकारण कर्ज घेणं का टाळलं पाहिजे?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत १०१ आणि प्रार्थना