व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२५ नोव्हेंबर–१ डिसेंबर

स्तोत्रं १०९-११२

२५ नोव्हेंबर–१ डिसेंबर

गीत १४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. राजा येशूला साथ द्या!

(१० मि.)

स्वर्गात गेल्यावर येशू यहोवाच्या उजव्या हाताला बसला (स्तो ११०:१; टेहळणी बुरूज०६ ९/१ १८ ¶६)

१९१४ पासून येशू आपल्या शत्रूंवर विजय मिळवत आहे (स्तो ११०:२; टेहळणी बुरूज०० ४/१ १८ ¶३)

येशूच्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी आपण स्वतःहून होता होईल तितकं करू शकतो (स्तो ११०:३; सेवा स्कूल ७६ ¶२)

स्वतःला विचारा, ‘राज्याला पाठिंबा देण्यासाठी मला कोणती ध्येयं ठेवता येतील?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. पत्रिकेचा वापर करून संभाषण सुरू करा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)

५. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न २३—विषय: यहोवाचे साक्षीदार सैन्यात भरती का होत नाहीत? (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ४)

६. शिष्य बनवण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

गीत ७२

७. आपण एकनिष्ठपणे राज्याला पाठिंबा कसा देऊ शकतो?

(१५ मि.) चर्चा.

यहोवाचं राज्य या गोष्टीचा पुरावा आहे की तोच स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्वोच्च अधिकारी आहे. (दान २:४४, ४५) त्यामुळे, जेव्हा आपण देवाच्या राज्याला पाठिंबा देतो तेव्हा त्याच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करत असतो.

‘शांतीच्या राजकुमाराला’ एकनिष्ठपणे पाठिंबा द्या हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  •   आपण देवाच्या राज्याला एकनिष्ठपणे पाठिंबा कसा देतो?

देवाच्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी खाली दिलेल्या प्रत्येक मार्गाला जुळणारं एक वचन लिहा.

  •   आपण देवाच्या राज्याला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देतो.

  •   आपण राज्याच्या नैतिक स्तरांप्रमाणे जगतो.

  •   आपण आवेशाने राज्याबद्दल इतरांना सांगतो.

  •   आपण जगाच्या सरकारांना आदर देतो. पण जेव्हा कैसराचे नियम देवाच्या नियमांच्या आड येतात तेव्हा मात्र आपण देवाचेच नियम पाळतो.

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७५ आणि प्रार्थना