व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

३० डिसेंबर, २०२४–५ जानेवारी, २०२५

स्तोत्रं १२०-१२६

३० डिसेंबर, २०२४–५ जानेवारी, २०२५

गीत १४४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

बाबेलमधून परत आलेल्या इस्राएली लोकांच्या मेहनतीवर यहोवाने आशीर्वाद दिल्यामुळे ते आनंदी आहेत

१. त्यांनी अश्रू गाळत पेरणी केली, पण आनंदाने कापणी केली

(१० मि.)

शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी जेव्हा इस्राएली लोकांची बाबेलमधून सुटका करण्यात आली तेव्हा त्यांना आनंद झाला (स्तो १२६:१-३)

जे इस्राएली बाबेलमधून परत आले त्यांना खूप मेहनत करावी लागली. यामुळे कदाचित त्यांना अश्रू गाळावे लागले असतील (स्तो १२६:५; टेहळणी बुरूज०४ ६/१ १६ ¶१०)

लोकांनी हार मानली नाही आणि त्यांना आशीर्वाद मिळाले (स्तो १२६:६; टेहळणी बुरूज२१.११ २४ ¶१७; टे.बु.०१ ७/१५ १८-१९ ¶१३-१४; चित्र पाहा)

यावर मनन करा: हर्मगिदोनानंतर जेव्हा आपल्याला जवळजवळ सगळं काही पुन्हा बांधावं लागेल तेव्हा आपल्याला कोणती आव्हानं येतील? पण आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील?

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १२३:२—यहोवावर आपलं लक्ष केंद्रित करण्यात कोणत्या गोष्टी सामील आहेत? (टेहळणी बुरूज१८.०७ १२-१३ ¶१, २)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ५)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. मागच्या भेटीत घरमालकाने बायबलवर विश्‍वास ठेवता येईल की नाही याबद्दल शंका असल्याचं सांगितलं होतं. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)

६. शिष्य बनवण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

गीत १५५

७. देवाने दिलेल्या अभिवचनांमुळे आनंदी व्हा

(१५ मि.) चर्चा.

यहोवाने बाबेलच्या बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांना दिलेली अभिवचनं पूर्ण केली. त्याने त्यांची सुटका केली आणि आध्यात्मिक अर्थाने त्यांना बरं केलं. (यश ३३:२४) इस्राएलमध्ये बऱ्‍याच काळापासून लोकवस्ती नसल्यामुळे तिथे सिंह आणि इतर जंगली प्राणी वाढले होते. यहोवाने आपल्या लोकांना आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांना त्यांच्यापासूनसुद्धा वाचवलं असावं. (यश ६५:२५) आता ते आपल्या स्वतःच्या घरात आनंदाने राहू शकत होते आणि स्वतः लावलेल्या द्राक्षमळ्याचं फळ खाऊ शकत होते. (यश ६५:२१) देवाने त्यांच्या मेहनतीवर आशीर्वाद दिला आणि ते मोठं आयुष्य जगले.—यश ६५:२२, २३

Waterfall: Maridav/stock.adobe.com; mountains: AndreyArmyagov/stock.adobe.com

देवाने दिलेल्या शांतीच्या अभिवचनांमुळे आनंदित व्हा—निवडक भाग हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  •   या भविष्यवाण्या आज कशा पूर्ण होत आहेत?

  •   या भविष्यवाण्या नवीन जगात मोठया प्रमाणात कशा पूर्ण होतील?

  •   कोणती भविष्यवाणी खासकरून तुम्हाला पूर्ण होताना पाहायला आवडेल?

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५८ आणि प्रार्थना