व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

४-१० नोव्हेंबर

स्तोत्र १०५

४-१० नोव्हेंबर

गीत ३ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

१. “त्याचा करार तो सर्वकाळ आठवणीत ठेवतो”

(१० मि.)

यहोवाने अब्राहामला अभिवचन दिलं आणि त्याबद्दल नंतर इसहाक आणि याकोबलाही सांगितलं (उत्प १५:१८; २६:३; २८:१३; स्तो १०५:८-११)

हे अभिवचन पूर्ण होणार नाही असं वाटत होतं (स्तो १०५:१२, १३; टेहळणी बुरूज२३.०४ २८ ¶११-१२)

अब्राहामसोबत केलेला करार यहोवा कधीच विसरला नाही (स्तो १०५:४२-४४; इन्साइट-२ १२०१ ¶२)


स्वतःला विचारा, ‘यामुळे यहोवावर पूर्णपणे भरवसा ठेवायला मला कशी मदत होते?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • स्तो १०५:१९—‘यहोवाच्या वचनांमुळे’ योसेफला चांगले गुण वाढवायला कशी मदत झाली? (टेहळणी बुरूज१६.०८ २३ ¶१३)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(१ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक व्यस्त आहे. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ५)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(२ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक वाद घालायचा प्रयत्न करतो तेव्हा प्रेमाने आणि शांतीने संभाषण तिथेच थांबवा. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ५)

६. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. मागच्या भेटीत ज्या विषयात आवड दाखवली होती त्या विषयावर असणारं मासिक वाचायला आवडेल का ते विचारा. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)

७. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. JW लायब्ररी ॲपबद्दल समोरच्या व्यक्‍तीला सांगा आणि ते डाऊनलोड करायला मदत करा. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)

ख्रिस्ती जीवन

गीत ८४

८. तुमच्या प्रेमाचा पुरावा

(१५ मि.) चर्चा.

जेव्हा आपण आपला वेळ, शक्‍ती आणि साधनसंपत्ती राज्याच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी वापरतो, तेव्हा आपण आपल्या राजावर, ख्रिस्त येशूवर प्रेम असल्याचं दाखवत असतो. अशा प्रकारे आपण आपलं प्रेम दाखवतो, तेव्हा यहोवाला आनंद होतो आणि भाऊबहिणींना फायदा होतो. (योह १४:२३) “दान किए गए पैसों का इस्तेमाल कैसे किया जाता है?” या jw.org वर असलेल्या लेखमालिकेत जगभरातल्या भाऊबहिणींना आपल्या दानातून कशा प्रकारे जबरदस्त मदत होत आहे ते सांगितलंय.

तुमच्या दानामध्ये आहे ताकद! हा व्हिडिओ दाखवा. मग विचारा:

  •   मिळालेल्या दानाचा आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी वापर केल्यामुळे भाऊबहिणींना कसा फायदा झाला आहे?

  •   मिळालेल्या दानाचा ‘समानतेने’ वापर केल्यामुळे राज्य सभागृहांच्या बांधकामांसाठी त्याचा कसा फायदा झाला आहे?—२कर ८:१४

  •   बायबलचं अनेक भाषांमध्ये भाषांतर करायच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी मिळालेल्या दानाचा वापर केल्यामुळे कोणते फायदे झाले आहेत?

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ९४ आणि प्रार्थना