व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?—कसं वापरावं

बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?—कसं वापरावं

बायबलमधून शिकायला मिळतं * आणि बायबल नेमके काय शिकवते ही दोन्ही पुस्तकं एकसारखी आहेत. आपल्या शिकवण्याच्या साधनांतील या दोन्ही पुस्तकांत एकाच क्रमात बायबलमधील सत्यं दिलेली आहेत. पण बायबलमधून शिकायला मिळतं या पुस्तकात सोप्या भाषेत आणि सहज समजता येईल अशा प्रकारे विषय दिले आहेत. बायबल नेमके काय शिकवते हे पुस्तक ज्यांना समजण्यास कठीण वाटेल त्यांच्यासाठी बायबलमधून शिकायला मिळतं हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. बायबलमधून शिकायला मिळतं या पुस्तकात परिशिष्टांऐवजी अंत्यटिपा दिल्या आहेत. ज्यात मुख्य विषयातील काही शब्द किंवा विषय सोप्या शब्दांत समजावले आहेत. अध्यायाच्या सुरुवातीला प्रश्न आणि शेवटी उजळणी चौकट दिलेली नाही. त्याऐवजी पूर्ण अध्यायात ज्या बायबल सत्यांबद्दल समजावण्यात आलं आहे, त्यांचा सारांश शेवटी दिला आहे. बायबल नेमके काय शिकवते या पुस्तकाप्रमाणेच, बायबलमधून शिकायला मिळतं हे पुस्तकसुद्धा आपण महिन्यादरम्यान कधीही म्हणजे, जरी ते त्या महिन्याची सादरता नसेल तरी ते सादर करू शकतो. बायबलमधून शिकायला मिळतं या पुस्तकातील वैशिष्ट्यांचा बायबल अभ्यास करताना आपण कसा वापर करू शकतो?

सारांश: बायबल अभ्यास करताना आपण बायबल नेमके काय शिकवते पुस्तकातून परिच्छेद वाचून, त्यावरील प्रश्न विचारतो. बहुतेक विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत सोपी असते. पण समजा एखाद्याला भाषेचं कमी ज्ञान असेल किंवा त्याला जास्त वाचता येत नसेल तर? अशा वेळी आपण बायबलमधून शिकायला मिळतं या पुस्तकातल्या अध्यायाच्या शेवटी दिलेल्या सारांशाचा वापर करून अभ्यास करू शकतो आणि त्यांना मुख्य लेख स्वतःहून वाचण्याचं प्रोत्साहन देऊ शकतो. प्रत्येक बायबल सत्य शिकवण्यासाठी जवळपास १५ मिनिटं लागू शकतात. सारांशात मुख्य लेखातील सर्व माहिती नसल्यामुळे बायबल अभ्यास घेणाऱ्यांनी, विद्यार्थ्याला लक्षात ठेवून चांगली तयारी केली पाहिजे. जर बायबल अभ्यास मुख्य लेखावर चर्चा करून घेतला जात असेल तर सारांशाचा वापर उजळणीसाठी करता येईल.

अंत्यटिपा: अंत्यटिपांमध्ये दिलेले शब्द आणि विषय अध्यायांच्या क्रमांनुसार आहेत. बायबल अभ्यासाच्या वेळी बायबलमधून शिकायला मिळतं पुस्तकातल्या अंत्यटिपांवर चर्चा करायची की नाही हे बायबल अभ्यास घेणारे ठरवू शकतात.

^ परि. 3 हे प्रकाशन सध्या मराठीत उपलब्ध नाही.