व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उपदेशक ७-१२

“आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर”

“आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर”

आपल्या निर्माणकर्त्याला स्मरण्याचा किंवा आठवणीत ठेवण्याचा मार्ग म्हणजे तरुण असताना आपली कौशल्यं त्याच्या सेवेत वापरणं

१२:१, १३

  • संघटनेत आव्हानात्मक कामगिरी स्वीकारण्यासाठी लागणारं बळ आणि उत्साह अनेक तरुणांमध्ये असतो

  • म्हातारपण येण्याआधी तरुणांनी आपली शक्ती आणि वेळ देवाच्या सेवेत वापरली पाहिजे

वृद्धावस्थेत तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांचं वर्णन शलमोनाने आलंकारिक भाषेत केलं

१२:२-७

  • वचन ३: “खिडक्यांतून पाहणाऱ्या अंध होतील”

    कमी दिसू लागतं

  • वचन ४: “सर्व गायनस्वर मंदावतील”

    कमी ऐकू येतं

  • वचन ५: “इच्छा थकेल,” पं.र.भा.

    भूक लागत नाही