ख्रिस्ती जीवन
तिचा पती देशाच्या वडील मंडळीत ओळखता येतो
एका सद्गुणी पत्नीमुळे पतीचा आदर वाढतो. राजा लमुएलच्या काळात, ज्या पुरुषाची पत्नी सद्गुणी असायची त्याला देशाच्या वडील मंडळीत ओळखलं जायचं. (नीति ३१:२३) आज मंडळीत बांधव, वडील किंवा साहाय्यक सेवक या नात्याने सेवा करतात. जर ते विवाहित असतील तर ही सेवा करण्यास ते पात्र आहेत की नाही, हे त्यांच्या पत्नीच्या चांगल्या वागण्यावर आणि ती त्याला करत असलेल्या साहाय्यावर देखील अवलंबून असतं. (१ तीम ३:४, ११) अशा सद्गुणी पत्नीची कदर फक्त तिचा पतीच नाही तर मंडळीदेखील करते.
पुढील गोष्टी करून एक सद्गुणी पत्नी आपल्या पतीला मंडळीत सेवा करायला मदत करते
-
त्याला प्रेमळ शब्दांनी प्रोत्साहन देते.—नीति ३१:२६
-
मंडळीमध्ये पतीला सेवा करता यावी यासाठी ती त्याच्यासोबतच्या आपल्या वैयक्तिक वेळेचा आनंदाने त्याग करते.—१ थेस २:७, ८
-
ती आपलं राहणीमान साधं ठेवते.—१ तीम ६:८
-
मंडळीच्या खासगी गोष्टींबद्दल ती पतीला विचारत नाही.—१ तीम २:११, १२; १ पेत्र ४:१५