सद्गुणी पत्नी कशी असते याबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे
नीतिसूत्रे अध्याय ३१ मध्ये राजा लमुएलच्या आईने त्याला एक महत्त्वाचा सल्ला दिला. एका सद्गुणी पत्नीमध्ये कोणते गुण असले पाहिजेत हे तिने त्याला शिकवलं.
सद्गुणी पत्नी भरवशालायक असते
-
ती आपल्या पतीच्या अधीन राहून, कुटुंबात निर्णय घेतले जात असताना मोलाचे सल्ले देते
-
तिच्या पतीला भरवसा असतो की ती योग्य निर्णय घेईल. प्रत्येक गोष्टीत तिने त्याची मंजुरी घ्यावी असा तो हट्ट धरत नाही
सद्गुणी पत्नी मेहनती असते
-
तिच्या कुटुंबामध्ये सर्वांसाठी कपडे आणि पुरेसं अन्न असावं यासाठी ती काटकसर करून साधं जीवन जगते.
-
ती खूप मेहनत करते आणि रात्रंदिवस आपल्या कुटुंबाची काळजी घेते.