व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रकटीकरण १-३

तुझी कार्यं मला माहीत आहेत

तुझी कार्यं मला माहीत आहेत

१:२०; :१, २

  • “सात तारे”: अभिषिक्‍त वडील. हे इतर सर्व वडिलांनाही लागू केलं जाऊ शकतं

  • येशूच्या “उजव्या हातात”: या ताऱ्‍यांवर येशूचं पूर्ण नियंत्रण आणि अधिकार आहे आणि तो त्यांना मार्गदर्शनही देतो. एखाद्या वडिलांची चूक सुधारण्याची गरज असेल तर येशू हे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करेल

  • सोन्याचे “सात दीपस्तंभ”: ख्रिस्ती मंडळी. ज्याप्रमाणे दीपस्तंभ निवासमंडपात प्रकाश पुरवायचा, त्याप्रमाणेच ख्रिस्ती मंडळी आध्यात्मिक प्रकाश पुरवते. (मत्त ५:१४) येशू या दीपस्तंभांमधून “चालतो” म्हणजेच मंडळींच्या सर्व कार्यांवर तो देखरेख करतो