व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

यहोवाला आपल्या गरजा माहीत आहेत

यहोवाला आपल्या गरजा माहीत आहेत

विश्‍वासू आणि बुद्धिमान दास आपल्याला “योग्य वेळी” अन्‍न पुरवतो. यावरून दिसून येतं की आध्यात्मिक रीत्या आपल्याला कशाची गरज आहे हे यहोवाला माहीत आहे. आणि तोच या दासाला ते अन्‍न पुरवण्याचं मार्गदर्शन देतो. (मत्त २४:४५) आपली प्रांतीय अधिवेशनं, आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभा, आणि यांसारख्या इतर तरतुदी याचा पुरावा देतात.

२०१७ सालचा शिक्षण समितीचा अहवाल हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • अधिवेशनांमधून आपल्याला योग्य वेळी जे प्रोत्साहन मिळतं त्याचं श्रेय आपण कोणाला दिलं पाहिजे आणि का?

  • अधिवेशनाची तयारी कधीपासून सुरू होते?

  • अधिवेशनासाठी विषय कसे निवडले जातात?

  • अधिवेशनाची तयारी करण्यासाठी काय काय केलं जातं?

  • गिलियड प्रशालेत अभ्यासासाठी जी पद्धत वापरली जाते तिचा उपयोग आता आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेची माहिती तयार करताना कसा केला जातो?

  • सभेसाठी असणारी कार्यपुस्तिका तयार करताना वेगवेगळे विभाग कशा प्रकारे एकत्र मिळून काम करतात?

आपला विश्‍वास मजबूत करण्यासाठी यहोवा पुरवत असलेल्या तरतूदींबद्दल तुम्हाला कसं वाटतं?