व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

लग्नसोहळ्याची तयारी करताना जगाचा प्रभाव टाळा

लग्नसोहळ्याची तयारी करताना जगाचा प्रभाव टाळा

लग्नाच्या दिवसाची तयारी करणाऱ्‍या जोडप्याला खूप निर्णय घ्यावे लागतात. आपल्या समाजाप्रमाणे अगदी थाटामाटात लग्न करण्याचा दबाव त्यांच्यावर येऊ शकतो. लग्नात काय काय करायचं याबद्दल त्यांचे नातेवाईक आणि मित्र आपापले सल्ले कदाचित त्यांना देतील. एका ख्रिस्ती जोडप्याने लग्नाची अशा प्रकारे तयारी केली पाहिजे ज्यामुळे त्यांना नंतर पस्तावा होणार नाही आणि त्यांचा विवेक शुद्ध राहिल. यासाठी कोणती बायबल तत्त्वं त्यांना मदत करतील?

यहोवाचा गौरव करणारा लग्नसोहळा हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • निक आणि जुलिआना यांना खाली दिलेल्या बायबल तत्त्वांमुळे कशी मदत झाली?

  • लग्न ठरलेल्या जोडप्याने एका प्रौढ ख्रिस्ती बांधवाला “मेजवानीची देखरेख” करणारा म्हणून का निवडलं पाहिजे?—योह २:९, १०.

  • निक आणि जुलिआना यांनी लग्नाबद्दल कोणते काही व्यक्‍तिगत निर्णय घेतले आणि का?

  • लग्नसोहळा आणि रिसेप्शन यांबद्दल निर्णय घेण्याची जबाबदारी कोणाची आहे?—टेहळणी बुरूज०६ ११/१ पृ. १८ परि. १०.