२३-२९ नोव्हेंबर
लेवीय ६-७
गीत २ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“आभार मानण्याचा एक मार्ग”: (१० मि.)
लेवी ७:११, १२—शांती-अर्पण हा स्वेच्छेने यहोवाचे आभार मानण्याचा एक मार्ग होता (टेहळणी बुरूज१९.११ पृ.२२-२३ परि. ९)
लेवी ७:१३-१५—एक व्यक्ती जेव्हा आपल्या कुटुंबासोबत मिळून शांती-अर्पण द्यायची तेव्हा एका अर्थाने ती आणि तिचं कुटुंब यहोवासोबत जेवायचं. यावरून त्यांचे यहोवासोबत शांतीचे संबंध आहेत हे दिसून यायचं (टेहळणी बुरूज०० ८/१५ पृ. १५-१६ परि. १५)
लेवी ७:२०—यहोवा फक्त शुद्ध असलेल्या व्यक्तींकडूनच शांती-अर्पण स्वीकारायचा (टेहळणी बुरूज०० ८/१५ पृ. १९ परि. ८)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
लेवी ६:१३—वेदीवर जळत असलेली आग कोणी लावली याबद्दल यहुदी लोकांचा काय विश्वास आहे, पण बायबल याबद्दल काय म्हणतं? (इन्साइट-१ पृ. ८३३ परि. १)
लेवी ६:२५—पार्पापण हे होमार्पण आणि शांती-अर्पण यांच्यापेक्षा वेगळं कसं होतं? (ऑल स्क्रिप्चर पृ. २७ परि. १५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी ६:१-१८ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती क्र. २ २०२० यामध्ये असलेल्या एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल सांगा आणि ते नियतकालिक द्या. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला आपल्या वेबसाईटबद्दल सांगा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ११)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १७ परि. १२-१३ (शिकवणे अभ्यास ६)
ख्रिस्ती जीवन
यहोवाचे मित्र बना—कदर बाळगा: (५ मि.) व्हिडिओ दाखवा. त्यानंतर, मंडळीत लहान मुलं असतील तर आधीच निवडलेल्या काही मुलांना स्टेजवर बोलवा आणि त्यांना व्हिडिओबद्दल प्रश्न विचारा.
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) आनंदी कुटुंब भाग २
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ५० आणि प्रार्थना