व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय ८-९

यहोवाचा आशीर्वाद असल्याचा पुरावा

यहोवाचा आशीर्वाद असल्याचा पुरावा

८:६-९, १२; ९:१-५, २३, २४

अहरोन आणि त्याच्या मुलांना जेव्हा याजकपद दिलं गेलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा यहोवाला होमार्पण दिलं. त्या वेळी यहोवाने स्वर्गातून अग्नी पाठवला आणि ते बलिदान भस्म केलं. यावरून हे दिसून आलं की याजकांच्या या नियुक्‍तीला यहोवाचा पाठिंबा होता आणि ही व्यवस्था त्याला मान्य होती. तिथे जमलेल्या इस्राएली लोकांनीही या व्यवस्थेला पाठिंबा द्यावा असं प्रोत्साहन यहोवा त्यांना देत होता. आज यहोवा, गौरवशाली येशू ख्रिस्ताचा महायाजक म्हणून वापर करत आहे. (इब्री ९:११, १२) १९१९ साली येशूने अभिषिक्‍त जणांच्या लहान गटाला “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” म्हणून नियुक्‍त केलं. (मत्त २४:४५) आज आपल्या काळात या विश्‍वासू दासावर यहोवाचा आशीर्वाद असल्याचे कोणते पुरावे आहेत? आणि त्याला त्याची स्वीकृती आणि त्याचा पाठिंबा आहे हे आपल्याला कशावरून दिसून येतं?

  • विश्‍वासू दासाला सतत तीव्र छळाचा सामना करावा लागत असला तरीही तो आपल्याला नियमितपणे आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहे

  • भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे आनंदाच्या संदेशाचा “संपूर्ण जगात” प्रचार केला जात आहे.—मत्त २४:१४

आपण विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाला पूर्णपणे पाठिंबा कसा देऊ शकतो?