ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यात आपली कौशल्यं वाढवा—टेलिफोनचा वापर करून
हे का महत्त्वाचं: टेलिफोनचा वापर करून प्रचार करणं, ही इतरांना “आनंदाच्या संदेशाची अगदी पूर्णपणे साक्ष” देण्याची एक महत्त्वाची पद्धत आहे. (प्रेका २०:२४) * काही कारणांमुळे आपल्याला लोकांना भेटता येत नाही, तेव्हा या मार्गाने आपण त्यांना साक्ष देऊ शकतो.
हे कसं करावं:
-
तयारी करा. योग्य विषय निवडा. मग तुम्हाला जे सांगायचं आहे ते थोडक्यात एका कागदावर लिहून काढा. जर तुम्हाला आन्सरिंग मशीनवर उत्तर द्यावं लागलं, तर तेव्हा तुम्ही काय बोलणार हेही आधीच ठरवून ठेवा. टेलिफोनवरून प्रचार करताना तुम्ही लिहून काढलेले मुद्दे तसंच तुम्हाला लागणाऱ्या इतर वस्तू जवळ घेऊन बसा आणि फोन किंवा टॅबवर JW Library® किंवा jw.org® उघडून ठेवा.
-
बोलताना घाईगडबड करू नका. आरामात बोला. नेहमी जसं बोलता तसंच बोला. ती व्यक्ती अगदी तुमच्या समोर आहे असे तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव असू द्या. थांबून थांबून बोलू नका. इतर भाऊबहिणींसोबत मिळून साक्षकार्य करा. जर समोरची व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारते तर तो प्रश्न पुन्हा बोलून दाखवा. त्यामुळे तुमच्या सोबतच्या प्रचारकाला त्या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल आणि तुम्हाला दाखवता येईल.
-
पुनर्भेटीसाठी पाया घाला. समोरच्या व्यक्तीने जर आवड दाखवली तर तिला एक प्रश्न विचारा आणि त्याचं उत्तर पुढच्या वेळी फोनवर द्याल असं सांगा. तुम्ही ई-मेलने, पोस्टाने किंवा स्वतः जाऊन एखादं प्रकाशन त्या व्यक्तीला देऊ शकता. तुम्ही तिला एखादा व्हिडिओ किंवा लेख, मेसेजने किंवा ई-मेलने पाठवू शकता. योग्य वेळी तुम्ही आपल्या वेबसाईटवरच्या इतर प्रकाशनांबद्दलही त्या व्यक्तीला सांगू शकता.
^ परि. 3 तुमच्या भागात जर टेलिफोनचा वापर करून प्रचार करायला परवानगी असेल तर पर्सनल डेटासंबंधी असलेले सुरक्षेचे नियम पाळणं गरजेचं आहे.