व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | एस्तेर १-५

एस्तेर देवाच्या लोकांच्या बाजूनं उभी राहिली

एस्तेर देवाच्या लोकांच्या बाजूनं उभी राहिली

देवाच्या लोकांची बाजू घेताना एस्तेरनं जबरदस्त विश्वास आणि धैर्य दाखवलं

  • राजानं बोलवलं नसताना त्याच्यासमोर जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. गेल्या ३० दिवसांत राजानं एस्तेरला बोलावलं नव्हतं

  • राजा अहशवेरोश, जो कदाचित झरक्सीस पहिला असावा, रागीट स्वभावाचा होता. एकदा त्यानं सगळ्यांना इशारा म्हणून एका माणसाचे दोन तुकडे करण्याची आज्ञा दिली होती. त्याची आज्ञा तोडल्यामुळं त्यानं राणी वश्तीलादेखील तिच्या पदावरून काढून टाकलं होतं

  • एस्तेरला, ती यहूदी असल्याचं राजाला सांगायचं होतं, आणि त्याचा विश्वासू सल्लागार त्याला धोका देत आहे हे पटवून द्यायचं होतं