ख्रिस्ताने आपल्यासाठी छळ सोसला
“तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो . . . त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले, व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले.”
-
येशूचा द्वेष करण्यात आला आणि त्याच्यावर देवाची निंदा करण्याचा आरोप लावण्यात आला. देव त्याला शिक्षा देत आहे असंही काहींना वाटलं
“त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले, . . . त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल.”
-
आपल्या मुलाचा जीव जाताना पाहून यहोवाला खूप त्रास झाला. पण तो पूर्णपणे विश्वासू राहिला याचा यहोवाला आनंद होता. येशूच्या मृत्यूमुळे, सैतानाने देवाच्या सेवकांच्या एकनिष्ठेवर जो प्रश्न उचलला होता त्याचं उत्तर मिळालं आणि पश्चात्तापी मानवांना बरेच फायदे झाले. यामुळे “परमेश्वराचा मनोरथ” म्हणजे यहोवाची इच्छा पूर्ण व्हायला मदत झाली.