ख्रिस्ती जीवन
तुमच्या मुलांना सृष्टिकर्त्यावर अटळ विश्वास ठेवायला मदत करा
सृष्टी यहोवाची महिमा करते. (स्तो. १९:१-४; १३९:१४) पण जीवनाची सुरुवात कशी झाली याबद्दल सैतानाचं जग, आपल्याला जे सिद्धांत शिकवतं त्यामुळे देवाची निंदा होते. (रोम. १:१८-२५) अशा कल्पना तुमच्या मुलांच्या मनात किंवा हृदयात रुजू नये यासाठी तुम्ही काय करू शकता? यहोवा अस्तित्वात आहे आणि तो वैयक्तिक रितीने तुमच्या मुलांची काळजी करतो, हा विश्वास वाढवण्यासाठी त्यांना लहानपणापासून मदत करा. (२ करिंथ. १०:४, ५; इफिस. ६:१६) त्यांना शाळेत, कॉलेजात काय शिकवलं जातं, याबद्दल त्यांच्या मनात कोणते विचार आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसंच, त्यांच्या हृदयापर्यंत पोचण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या साधनांचा वापर करा.—नीति. २०:५; याको. १:१९.
तुमचे साक्षीदार मित्र काय म्हणतात—देव आहे का? हा व्हिडिओ पाहा आणि पुढील प्रश्न विचारा:
देवाच्या अस्तित्वाबद्दल एक कोणता सर्वसामान्य गैरसमज आहे?
तुमच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये याबद्दल काय शिकवलं जातं?
यहोवा अस्तित्वात आहे, यावर तुमचा पक्का विश्वास का आहे?
देवाने सर्वकाही निर्माण केलं हे समजण्यास तुम्ही इतरांना कशी मदत कराल?