ख्रिस्ती जीवन
आपलं साहित्य विचारपूर्वक द्या
येशूने शिकवलं: “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.” (मत्त. १०:८) बायबल किंवा बायबल आधारित साहित्यासाठी लोकांकडून पैसे न घेण्याच्या स्पष्ट निर्देशनाचं आपण पालन करतो. (२ करिंथ. २:१७) पण या साहित्यात, देवाच्या वचनातली अनेक मौल्यवान सत्य आहेत. साहित्य छापण्यासाठी आणि ते जगभरातल्या मंडळ्यांमध्ये पोचवण्यासाठी भरपूर मेहनत आणि पैसा लागतो. त्यामुळे आपल्याला जितकं साहित्य लागतं तितकंच आपण घेतलं पाहिजे.
लोकांना साहित्य देताना समजूतदारपणे द्या आणि सार्वजनिक सेवाकार्य करतानासुद्धा हे लक्षात ठेवा. (मत्त. ७:६) रस्त्याने चालत असलेल्या लोकांना नुसतंच साहित्य देण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना संदेशाबद्दल आवड आहे की नाही हे जाणण्याचा प्रयत्न करा. पण जर कोणी एखादं विशिष्ट साहित्य मागितलं, तर त्यांना ते आनंदाने द्या.—नीति. ३:२७, २८.