यहोवाच्या प्रसन्नतेच्या वर्षाची घोषणा करा
“यहोवाच्या प्रसन्नतेचे वर्ष” हे एक लाक्षणिक वर्ष आहे
६१:१, २, पं.र.भा.
-
हे एका अशा काळाला सूचित करतं, जेव्हा यहोवा नम्र लोकांना त्यांच्या सुटकेच्या घोषणेला प्रतिसाद द्यायची संधी देतो
-
पहिल्या शतकात सा.यु. २९ मध्ये येशूने आपलं सेवाकार्य सुरू केलं, तेव्हा प्रसन्नतेचं वर्ष सुरू झालं आणि ते सा.यु. ७० मध्ये देवाच्या सूड घेण्याच्या दिवशी संपलं, जेव्हा जेरूसलेमचा नाश करण्यात आला
-
आपल्या दिवसात प्रसन्नतेचं वर्ष, १९१४ मध्ये सुरू झालं जेव्हा येशूला स्वर्गात राजा बनवण्यात आलं आणि ते मोठ्या संकटाने संपेल
यहोवा आपल्या लोकांना उंच धार्मिकतेच्या वृक्षांनी आशीर्वादित करतो
-
जगातली उंच झाडं, सहसा जंगलात सोबत वाढतात आणि ती एकमेकांना आधार देतात
-
त्यांची लांब पसरलेली मुळं एकमेकांत गुंतलेली असतात. त्यामुळे झाडांचा पाया मजबूत होतो आणि ती वादळाचा सामना करू शकतात
-
उंच झाडं लहान रोपांना सावली देतात आणि झाडांच्या पडलेल्या पानांमुळे खालची माती सुपीक होते
धार्मिकतेचे वृक्ष म्हणजे या पृथ्वीवर उरलेले अभिषिक्त बांधव, जगभरातल्या ख्रिस्ती मंडळीतल्या बांधवांना मदत आणि संरक्षण देतात, ज्यामुळे त्यांना फायदा होतो