व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

आपल्या आशेच्या आधारावर आनंदी राहा

आपल्या आशेच्या आधारावर आनंदी राहा

आशा ही एका नांगरासारखी आहे. (इब्री ६:१९) यामुळे आपण जेव्हा वादळी समुद्राचा सामना करतो तेव्हा आपलं आध्यात्मिक जहाज फुटून उद्ध्वस्त होण्यापासून वाचतं. (१ तीम. १:१८, १९) वादळी समुद्र म्हणजे, आपण केलेल्या चुका, भौतिक गोष्टींचं नुकसान, खूप काळापासून असलेला आजार, आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा आपल्या एकनिष्ठेची इतर कोणतीही परीक्षा.

आपल्याला ज्या प्रतिफळाचं अभिवचन दिलं आहे, ते विश्वास आणि आशा यांमुळे आपल्याला स्पष्टपणे दिसतं. (२ करिंथ. ४:१६-१८; इब्री ११:१३, २६, २७) आपली आशा स्वर्गातल्या जीवनाची असो किंवा या पृथ्वीवरच्या, आपण बायबलमध्ये दिलेल्या अभिवचनांवर नेहमी मनन करून त्या आशेला बळकट केलं पाहिजे. असं केल्याने जेव्हा आपण संकटांमुळे निराश होतो, तेव्हा आपला आनंद टिकवणं आपल्याला शक्य होईल.—१ पेत्र १:६, ७.

आपल्या आशेच्या आधारावर आनंदी राहा हा व्हिडिओ पाहा आणि त्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरं द्या:

  • मोशेच्या चांगल्या उदाहरणाचं आपण का अनुकरण केलं पाहिजे?

  • कुटुंबप्रमुखांवर कोणती जबाबदारी आहे?

  • कौटुंबिक उपासनेतल्या प्रोजेक्टसाठी तुम्ही कोण-कोणते विषय निवडाल?

  • आशेमुळे तुम्ही संकटांचा सामना आत्मविश्वासाने कसा करू शकता?

  • तुम्ही कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहात?