६-१२ फेब्रुवारी
यशया ४७-५१
गीत ६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाच्या आज्ञा पालन केल्याने अनेक आशीर्वाद मिळतात”: (१० मि.)
यश. ४८:१७—देवाकडून मिळणाऱ्या निर्देशनाचे पालन करण्यावर, खरी उपासना अवलंबून असते (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. १३१ परि. १८)
यश. ४८:१८—यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि आपण जीवनात आनंदी राहावं अशी त्याची इच्छा आहे (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. १३१-१३२ परि. १९)
यश. ४८:१९—यहोवाच्या आज्ञा पालन केल्याने सर्वकाळासाठी आशीर्वाद मिळतात (यशायाह की भविष्यवाणी-II पृ. १३२ परि. २०-२१)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यश. ४९:६—मसीहाचे पृथ्वीवरील सेवाकार्य हे इस्राएलच्या पुत्रांपर्यंतच मर्यादित होते, मग तो कोणत्या अर्थाने “राष्ट्रांचा प्रकाश” आहे? (टेहळणी बुरूज०७ २/१ पृ. ९-१० परि. ८)
यश. ५०:१—“तुमच्या आईस मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे?” असं यहोवाने इस्राएली लोकांना का विचारलं? (इन्साईट-१ पृ. ६४३ परि. ४-५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यश. ५१:१२–२३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? ही पत्रिका फेब्रुवारी महिन्यात सादर करण्यावर, प्रचारकांनी लक्ष केंद्रित करावं आणि आवड दाखवणाऱ्यांना बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ दाखवावा.
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (७ मि.) एक पर्याय, इयरबुकमधून शिकलेल्या धड्यांवर चर्चा करा. (इयरबुक१६ पृ. १४४-१४५)
यहोवाचे मित्र बना—यहोवाचं ऐका: (८ मि.) चर्चा. यहोवाचे मित्र बना—यहोवाचं ऐका हा व्हिडिओ दाखवून चर्चेची सुरुवात करा. त्यानंतर पुढील प्रश्नांवर चर्चा करा: आपण यहोवाची आज्ञा पाळण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आहे? (नीति. २७:११) मुलं कोणत्या काही मार्गांनी यहोवाची आज्ञा पाळू शकतात? मोठे लोक कोणत्या काही मार्गांनी यहोवाची आज्ञा पाळू शकतात?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १५ परि. १-१४, अध्या. १६ च्या पृ. १६० वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २९ आणि प्रार्थना