व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

“आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर”

“आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर”

“आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर,” ही आज्ञा महत्त्वाची आहे हे येशूने पृथ्वीवर असताना सांगितलं. (निर्ग २०:१२; मत्त १५:४) येशू असं उत्तेजन देऊ शकला कारण लहान असताना तो स्वतः आपल्या आईवडिलांच्या “आज्ञेत” होता. (लूक २:५१) तसंच मोठं झाल्यावर त्याने आधीच खात्री केली की आपल्या मृत्यूनंतर आपल्या आईची काळजी घेतली जाईल.—योह १९:२६, २७.

आजही जे ख्रिस्ती तरुण आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहतात आणि त्यांच्याशी आदरपूर्वक बोलतात ते त्यांचा सन्मान करत असतात. आईवडिलांचा आदर करा ही आज्ञा आजही लागू होते. आपले आईवडील जरी वृद्ध झाले असतील, तरी ते देत असलेला सल्ला ऐकण्याद्वारे आपण त्यांचा आदर करत राहिलं पाहिजे. (नीत २३:२२) आपल्या वृद्ध आईवडिलांची भावनिक व आर्थिक रीत्या मदत करण्याद्वारेही आपण त्यांना आदर दाखवू शकतो. (१ती ५:८) आपण तरुण असो वा वृद्ध, आपल्या आईवडिलांशी नेहमी संवाद साधल्यामुळे आपण त्यांना आदर दाखवू शकतो.

आईबाबांशी कसं बोलावं? असं शीर्षक असलेलं बोर्डवरचं कार्टून पाहा आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • आईवडिलांशी बोलणं कदाचित तुम्हाला कठीण का वाटू शकतं?

  • आईवडिलांशी बोलताना तुम्ही त्यांचा आदर करत आहात हे कसं दाखवू शकता?

  • आईवडिलांशी बोलण्यासाठी मेहनत घेणं फायद्याचं का आहे? (नीत १५:२२)

    आईवडिलांशी संवाद साधल्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला मदत होते