व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय १४-१५

मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवलं जातं

मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवलं जातं

इ.स. ३२ मध्ये वल्हांडण सणाआधी येशूने एक असा चमत्कार केला, ज्याचा उल्लेख चारही शुभवर्तमानाच्या लेखकांनी केला आहे.

या चमत्काराद्वारे येशूने एक असा नमुना घालून दिला, ज्याचं पालन आपल्या दिवसांतही केलं जाणार होतं.

१४:१६-२१

  • येशूच्या शिष्यांकडे फक्‍त पाच भाकरी आणि दोन मासे होते. असं असलं तरी, येशूने त्यांना एका समुदायाला जेवण पुरवायला सांगितलं

  • येशूने भाकरी व मासे घेतले आणि प्रार्थना केल्यावर त्याने ते शिष्यांना दिले आणि शिष्यांनी ते लोकांना दिले

  • तिथे सर्वांना पुरून उरेल इतकं अन्‍न होतं. येशूने मोजक्याच लोकांचा म्हणजेच त्याच्या शिष्यांचा उपयोग करून हजारो लोकांना चमत्कार करून जेवू घातलं

  • शेवटच्या दिवसांत “योग्य वेळी” आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी येशू एका माध्यमाचा उपयोग करेल असं त्याने सांगितलं होतं.—मत्त २४:४५

  • १९१९ मध्ये येशूने “आपल्या घरातील सेवकांना” अन्‍न पुरवण्यासाठी “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” म्हणजेच, अभिषिक्‍त बांधवांचा एक लहान गट याला नेमलं

  • या अभिषिक्‍त बांधवांच्या लहान गटाला नेमण्याद्वारे, पहिल्या शतकात येशूने घालून दिलेल्या नमुन्याचं त्याने पालन केलं

येशू लोकांना आध्यात्मिक रीत्या अन्‍न पुरवण्यासाठी ज्या माध्यमाचा उपयोग करत आहे त्यावर भरवसा असल्याचं मी कसं दाखवू शकतो आणि त्याचा आदर कसा करू शकतो?