तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी अडखळण बनू नये याची काळजी घ्या
तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांसाठी अडखळण बनू नये याचं महत्त्व पटवून देण्यासाठी येशूने काही दृष्टान्तांचा वापर केला.
-
‘अडखळायला लावणारा दगड’ हा अशा क्रियेला किंवा परिस्थितीला सूचित करतो जिच्यामुळे एक व्यक्ती वाईट मार्गाला लागते, नैतिक रीत्या अडखळते किंवा पाप करते
-
एक व्यक्ती जर कोणाला अडखळण्याचं कारण बनते तर अशी व्यक्ती स्वतःच्या गळ्यात जात्याचा दगड बांधून खोल समुद्रात पडलेली बरी
-
येशूने आपल्या शिष्यांना सल्ला दिला की जर ते एखाद्या गोष्टीमुळे अडखळले तर त्यांना ती गोष्ट काढून टाकायची होती; मग ती गोष्ट त्यांना मौल्यवान वाटत असली तरीही, जसं की हात किंवा डोळे
-
अशा मौल्यवान गोष्टींशी जडून राहून कायमच्या विनाशाला सूचित करणाऱ्या गेहेन्नात आपला जीव गमवण्यापेक्षा त्या गोष्टींचा त्याग करून देवाच्या राज्यात प्रवेश करणं चांगलं!
माझ्या जीवनात कोणती गोष्ट अडखळण्याचा दगड बनू शकते, आणि मी स्वतःला किंवा इतरांना अडखळण बनू नये याची काळजी कशी घेऊ शकतो?