व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय १२-१३

गहू आणि जंगली गवताचा दृष्टान्त

गहू आणि जंगली गवताचा दृष्टान्त

इ.स. ३३ पासून मानवजातीतून संपूर्ण गहू वर्ग म्हणजेच सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कसं आणि कधी निवडण्यात येईल, हे समजवण्यासाठी येशूने गहू आणि जंगली गवताचा दृष्टान्त दिला.

१३:२४

‘एका मनुष्याने आपल्या शेतात चांगलं बी पेरलं’

  • पेरणी करणारा: येशू

  • चांगलं बी पेरलं जातं: येशूच्या शिष्यांना पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त केलं जातं

  • शेत: जग किंवा मानवजात

१३:२५

“माणसं झोपेत असताना त्याचा एक शत्रू गव्हात जंगली गवताचं बी पेरून गेला”

  • शत्रू: दियाबल

  • माणसं झोपेत असताना: प्रेषितांचा मृत्यू

१३:३०

“कापणीपर्यंत दोन्ही सोबत वाढू द्या”

  • गहू: अभिषिक्‍त ख्रिश्‍चन

  • जंगली गवत: ढोंगी ख्रिश्‍चन

आधी जंगली गवत गोळा करा, मग गहू जमा करा

  • दास किंवा कापणी करणारे: देवदूत

  • गोळा केलेलं जंगली गवत: ढोंगी ख्रिश्‍चनांना अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपासून वेगळं केलं जातं

  • कोठारात जमा करणं: अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पुनःस्थापित झालेल्या मंडळीत जमा केलं जातं

कापणीचा काळ सुरू झाला तेव्हा खरे ख्रिश्‍चन ढोंगी ख्रिश्‍चनांपेक्षा वेगळे आहेत हे कसं दिसून आलं?

हा दृष्टान्त समजून घेतल्यामुळे मला व्यक्‍तिगत रीत्या कसा फायदा होऊ शकतो?