व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

धीर दाखवत आतुरतेनं वाट पाहत राहा

धीर दाखवत आतुरतेनं वाट पाहत राहा

तुम्ही किती वर्षांपासून देवाच्या राज्याची वाट पाहत आहात? कठीण परिस्थितीतून जात असताना तुम्ही धीर न सोडता तग धरून आहात का? (रोम ८:२५) कारण आपल्या काही बंधुभगिनींनी त्यासाठी द्वेष, वाईट वागणूक, तुरुंगवास एवढंच नव्हे तर मृत्यूचा धोकाही पत्करला आहे. आणि असेही काहीजण आहेत जे गंभीर आजारपण आणि वाढतं वय यांसारख्या कठीण परिस्थितींना तोंड देत आहेत.

मग अशा कठीण परिस्थितींचा सामना करत असताना धीरानं वाट पाहत राहण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते? यासाठी आपण दररोज बायबलचं वाचन करून त्यावर खोलवर विचार केला पाहिजे आणि त्याद्वारे आपल्या विश्‍वासाला आणखी मजबूत करत राहिलं पाहिजे. काहीही झालं तरी आपण आपली आशा आपल्या नजरेआड कधीच होऊ देता कामा नये. (२कर ४:१६-१८; इब्री १२:२) यासोबतच, यहोवाला प्रार्थना करून आपण त्याच्या पवित्र आत्म्यासाठी अक्षरशः भीक मागितली पाहिजे. (लूक ११:१०, १३; इब्री ५:७) म्हणजे मग “सहनशक्‍ती दाखवून आनंदाने धीर” धरता यावा म्हणून आपला प्रेमळ पिता आपल्याला मदत करेल​—कल १:११.

जीवनाच्या “शर्यतीत धीराने” धावण्याची गरज आहे​बक्षीस मिळेल याची खातरी बाळगा  असं शीर्षक असलेला व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • आपल्या जीवनात कोणत्या काही अनपेक्षित गोष्टी घडू शकतात? (उप ९:११)

  • संकटांचा सामना करत असताना प्रार्थना केल्यामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

  • यहोवाच्या सेवेत पूर्वीइतकं करता येत नसलं, तरी सध्या जितकं करता येईल तितकं करत राहणं का महत्त्वाचं आहे?

  • आपलं लक्ष बक्षिसावर केंद्रित करा

    आपल्याला बक्षीस मिळेलच अशी खात्री आपण कोणत्या गोष्टीमुळे बाळगू शकतो?