२५ फेब्रुवारी–३ मार्च
रोमकर ९-११
गीत ४६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“जैतुनाच्या झाडाचं उदाहरण”: (१० मि.)
रोम ११:१६—जैतुनाचं झाड देवाने अब्राहामसोबत केलेल्या कराराशी संबंधित असलेल्या देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेला सूचित करतं (टेहळणी बुरूज११ ५/१५ पृ. २३-२४ परि. १३)
रोम ११:१७, २०, २१—लाक्षणिक जैतुनाच्या झाडाला कलम केलेल्या अभिषिक्त लोकांनी आपल्या विश्वासाला टिकवून ठेवणं गरजेचं आहे (टेहळणी बुरूज११ ५/१५ पृ. २४ परि. १५)
रोम ११:२५, २६—आध्यात्मिक इस्राएलमध्ये असणाऱ्या सदस्यांच्या पूर्ण संख्येला “वाचवले जाईल” (टेहळणी बुरूज११ ५/१५ पृ. २५ परि. १९)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
रोम ९:२१-२३—महान कुंभार या नात्यानं यहोवा आपल्याला आकार देतो तेव्हा आपण योग्य प्रतिसाद का दिला पाहिजे? (टेहळणी बुरूज१३ ६/१५ पृ. २५ परि. ५)
रोम १०:२—आपण करत असलेली उपासना देवाविषयीच्या अचूक ज्ञानावर आधारित आहे की नाही याची खात्री करणं का महत्त्वाचं आहे? (इन्साइट-१ पृ. १२६० परि. २)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) रोम १०:१-१५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ६)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) दुसऱ्या पुनर्भेटीच्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा, आणि बायबलमधून शिकायला मिळतं या पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू केल्याचं दाखवा. (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
“सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—प्रगती न करणारे बायबल अभ्यास थांबवणं”: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १२ परि. १४-२०
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४९ आणि प्रार्थना