व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | रोमकर ९-११

जैतुनाच्या झाडाचं उदाहरण

जैतुनाच्या झाडाचं उदाहरण

११:१६-२६

लाक्षणिक जैतुनाच्या झाडाचे वेगवेगळे भाग कशाला सूचित करतात?

  • झाड: अब्राहामसोबत केलेल्या कराराशी संबंधित असणाऱ्‍या देवाच्या उद्देशाची पूर्णता

  • खोड: अब्राहामच्या संततीचा प्रमुख भाग असलेला येशू

  • फांद्या: अब्राहामच्या संततीचा दुय्यम भाग असलेले १,४४,००० अभिषिक्‍त जन

  • “तोडून टाकण्यात” आलेल्या फांद्या: जन्माने यहुदी असणारे असे लोक, ज्यांनी येशूला नाकारलं

  • “कलम करण्यात” आलेल्या फांद्या: सर्व राष्ट्रांमधून देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त केलेले ख्रिश्‍चन

आधीच भविष्यवाणी करण्यात आल्याप्रमाणे, येशू आणि १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी बनलेल्या अब्राहामच्या संततीद्वारे “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे” आशीर्वादित होतील.​—रोम ११:१२; उत्प २२:१८

यहोवाने ज्या प्रकारे अब्राहामच्या संततीबद्दल असणारा त्याचा उद्देश पूर्ण केला, त्यावरून मला त्याच्याबद्दल काय शिकायला मिळतं?