व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी​—प्रगती न करणारे बायबल अभ्यास थांबवणं

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी​—प्रगती न करणारे बायबल अभ्यास थांबवणं

हे का महत्त्वाचं: लोकांना जर तारण मिळवायचं असेल, तर त्यांनी यहोवाचं नाव घेऊन त्याला हाक मारणं गरजेचं आहे. (रोम १०:१३, १४) पण ही वस्तुस्थिती आहे की बायबलचा अभ्यास करणाऱ्‍या सर्वांनाच यहोवाच्या स्तरांनुसार जगण्याची इच्छा नसते. असं असलं तरी, काहीजण असेही आहेत ज्यांना यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची प्रामाणिक इच्छा आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी आपण आपल्या मौल्यवान वेळेचा सर्वात चांगला उपयोग करतो. पण जर एखादा बायबल विद्यार्थी पुरेसा वेळ देऊनही प्रगती करत नसेल तर काय? अशा वेळी त्याचा बायबल अभ्यास थांबवणंच योग्य असेल. त्यामुळे जो वेळ त्या ठिकाणी खर्च होत होता, तोच वेळ आता आपण अशा लोकांना देऊ शकतो ज्यांना यहोवाने स्वतःकडे आणि आपल्या संघटनेकडे आकर्षित केलं आहे. (योह ६:४४) पण नंतर जर असं लक्षात आलं, की बायबल अभ्यास बंद केलेला विद्यार्थी आता “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” दाखवत आहे तर आपण आनंदाने त्याचा अभ्यास पुन्हा सुरू करू शकतो.​—प्रेका १३:४८.

हे कसं करावं:

  • सत्याचं अचूक ज्ञान घेण्यासाठी विद्यार्थी दाखवत असलेल्या इच्छेबद्दल त्याची प्रशंसा करा.​—१ती २:४

  • शिकलेल्या गोष्टी लागू करणं महत्त्वाचं का आहे यावर जोर द्या.​—लूक ६:४६-४९

  • येशूच्या बी पेरणाऱ्‍याच्या दाखल्यावर चर्चा करून, कोणती गोष्ट विद्यार्थ्याच्या प्रगतीच्या आड येत आहे यावर विचार करण्यासाठी त्याला प्रेमळपणे मदत करा.​—मत्त १३:१८-२३

  • त्याचं मन न दुखावता तुम्ही अभ्यास का थांबवत आहात ते त्याला सांगा

  • त्याला उत्तेजन मिळावं म्हणून तुम्ही अधूनमधून कॉल कराल किंवा भेट द्याल आणि त्याची प्रगती दिसून आली तर त्याचा अभ्यास पुन्हा सुरू कराल असं त्याला सांगा

व्हिडिओ पाहा आणि नंतर खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • या व्हिडिओमध्ये, विद्यार्थी आध्यात्मिक प्रगती करत नसल्याचं कसं दिसून आलं?

  • विद्यार्थ्याने बदल करण्याची गरज आहे हे प्रचारकाने त्याला कसं समजावलं?

  • विद्यार्थ्याने प्रगती केली तर बायबल अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी प्रचारकाची इच्छा असल्याचं त्याने कसं दाखवलं?