१२-१८ एप्रिल
गणना २०-२१
गीत ३५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तणावात असतानाही नम्रता टिकवून ठेवा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)
गण २०:२३-२७—यहोवाने अहरोनची चूक सुधारली तेव्हा अहरोनने जी मनोवृत्ती दाखवली त्यातून आणि यहोवाचा त्याच्याबद्दल जो दृष्टिकोन होता त्यातून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज१४ ६/१५ २६ ¶१२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) गण २०:१-१३ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा आणि सहसा घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं साहित्य द्या. (शिकवणे अभ्यास ३)
भाषण: (५ मि.) सावध राहा! ४/१५ ८—विषय: मला माझ्या रागावर ताबा कसा ठेवता येईल? (शिकवणे अभ्यास १६)
ख्रिस्ती जीवन
इतरांना प्रोत्साहन मिळेल अशा गोष्टी बोला: (७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: दुसऱ्यांबद्दल वाईट बोलल्यामुळे किंवा त्यांची टिका केल्यामुळे इतरांवर कसा परिणाम होतो? या व्हिडिओत दाखवलेल्या बांधवाला कोणत्या गोष्टीमुळे स्वतःमध्ये बदल करता आला?
सोबत्यांच्या दबावाचा यशस्वी रीत्या सामना करा!: (८ मि.) चर्चा. बोर्डवरची कार्टून्स दाखवा. आणि पुढे दिलेले प्रश्न विचारा: बऱ्याच जणांना कोणत्या दबावाचा सामना करावा लागतो? निर्गम २३:२ मध्ये कोणता सल्ला दिला आहे? सोबत्यांच्या दबावाचा सामना करत असताना कोणत्या चार गोष्टी तुम्हाला मदत करतील?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) चिमुकल्यांना शिकवा धडा ३
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २७ आणि प्रार्थना