व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इ.स. ३३ चा वल्हांडण सण साजरा करण्यासाठी पेत्र आणि योहान माडीवरच्या खोलीत तयारी करत आहेत.

ख्रिस्ती जीवन

तुम्ही स्मारकविधीची तयारी करत आहात का?

तुम्ही स्मारकविधीची तयारी करत आहात का?

येशूने साजरा केलेला शेवटचा वल्हांडण सण खूप खास होता. कारण त्या वेळी त्याने आपल्या शिष्यांसोबत वल्हांडणाचं भोजन केलं आणि त्यांना एका नवीन विधीची सुरूवात करून दिली. वर्षांतून एकदा येणारा हा विधी म्हणजे प्रभूचं सांजभोजन. या शेवटच्या भोजनाची तयारी करायला येशूने पेत्र आणि योहान यांना पुढे पाठवलं. (लूक २२:७-१३; पहिल्या पानावरचं चित्र पाहा.) यामुळे आपणही २७ मार्च रोजी होणाऱ्‍या स्मारकविधीची तयारी करायला हवी. मंडळीतल्या जबाबदार बांधवांनी वक्त्याची, प्रतीकांची आणि इतर गोष्टींची नक्कीच योजना केली असेल. पण आपण स्वतः स्मारकविधीसाठी कशी तयारी करू शकतो?

तुमचं मन तयार करा. स्मारकविधीसाठी असलेलं बायबल वाचन करून त्यावर मनन करा. शास्त्रवचनांचे दररोज परिक्षण करा  या पुस्तिकेत याचा आराखडा दिलेला आहे. तसंच नवे जग भाषांतर  यात असलेल्या अतिरिक्‍त लेख ख१२ मध्ये जास्त माहिती असलेला आराखडा दिलेला आहे. (एप्रिल २०२० ची जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका  पाहा.) वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स  किंवा यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शिका  या साहित्यांमध्ये खंडणीचं महत्त्व सांगणारे बरेच लेख तुम्हाला सापडतील. कौटुंबिक उपासनेत तुम्ही या माहितीवर चर्चा करू शकता.

इतरांना आमंत्रित करा. आमंत्रणपत्रिका देण्याच्या मोहिमेत पुरेपूर सहभाग घ्या. तुम्ही कोणाकोणाला आमंत्रण देऊ शकता याचा विचार करा. जसं की तुमच्या पुनर्भेटी, पूर्वीचे बायबल विद्यार्थी, ओळखीचे लोक किंवा तुमचे नातेवाईक. मंडळीतले वडीलसुद्धा अक्रियाशील झालेल्यांना आठवणीने आमंत्रण देतील. जर एखादी व्यक्‍ती तुमच्या क्षेत्रात राहत नसेल, तर jw.org या वेबसाईटवर तुम्ही तिच्या जवळचं ठिकाण शोधू शकता. त्यासाठी वेबसाईटच्या मुख्य पानावर, वरच्या बाजूला असलेल्या ‘आमच्याविषयी’ या टॅबवर क्लिक करा. आणि “स्मारकविधी” असं लिहिलेला पर्याय निवडून जवळचं ठिकाण शोधा.

आपण आणखी कोणत्या गोष्टींची तयारी करू शकतो?