व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा

देवाच्या वचनाचा वापर करा

देवाच्या वचनाचा वापर करा

देवाच्या वचनात जबरदस्त ताकद आहे! (इब्री ४:१२) जे देवाला ओळखत नाहीत, अशा लोकांच्या मनालाही ते स्पर्श करतं. (१थेस १:९; २:१३) आपण लोकांना बायबलचं सत्य सांगतो. आणि या सत्याची जेव्हा ते कदर करतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो.

शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—लोकांना देवाच्या वचनाचं सामर्थ्य अनुभवायला मदत करून  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • निताने जेडचं लक्ष देवाच्या वचनाकडे वळवण्यासाठी कसा तर्क केला?

  • तुम्हाला काय वाटतं, निताने जेडला वचन मोठ्याने का वाचायला सांगितलं आणि तिने वचनातल्या महत्त्वाच्या भागावर जेडचं लक्ष कसं वेधलं?

  • कोणती गोष्ट दाखवते की जेडच्या मनावर त्या वचनाचा प्रभाव झाला आणि या गोष्टीचा नितावर कसा परिणाम झाला?