सेवाकार्यासाठी तयार व्हा | सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा
प्रश्न विचारा
यहोवा एक ‘आनंदी देव’ असल्यामुळे आपणही त्याची सेवा आनंदाने करावी असं त्याला वाटतं. (१ती १:११) आपण जसजसं आपल्या सेवेतली कौशल्यं वाढवू तसतसा आपला आनंदही वाढत जाईल. प्रश्न विचारल्यामुळे उत्सुकता वाढते आणि त्यामुळे चर्चा सहजपणे सुरू करता येते. प्रश्नांमुळे एखाद्याला विचार करायला आणि तर्क करायला मदत होते. (मत्त २२:४१-४५) आपण प्रश्न विचारला पाहिजे आणि लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. असं केल्यामुळे आपण हे दाखवत असतो, की समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्याला आवड आहे. (याक १:१९) तसंच, तिने दिलेल्या उत्तरामुळे आपल्याला चर्चा पुढे सुरू ठेवायलाही मदत होते.
शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा-प्रश्न विचारून हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
जेडमध्ये कोणते चांगले गुण तुम्हाला दिसून आले?
-
जेडची ओळख करून घ्यायला निताने काय केलं?
-
आनंदाच्या बातमीबद्दल जेडची उत्सुकता वाढावायला निताने कोणता प्रश्न विचारला?
-
निताने कशा प्रकारे प्रश्न विचारून जेडला विचार करायला लावला?