देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
गर्व आणि फाजील आत्मविश्वासापासून सावध राहा
गर्वामुळे आणि फाजील आत्मविश्वासामुळे कोरहने यहोवाच्या व्यवस्थेविरूद्ध बंड केलं (गण १६:१-३; टेहळणी बुरूज११ ९/१५ २७ ¶१२)
कोरह एक लेवी होता. त्याला सेवेचे अनेक बहुमान मिळाले होते. लोक त्याचा आदर करायचे (गण १६:८-१०; टेहळणी बुरूज११ ९/१५ २७ ¶११)
कोरहला त्याच्या चुकीच्या विचारसरणीमुळे खूप वाईट परिणाम भोगावे लागले (गण १६:३२, ३५)
यहोवाच्या सेवेत जरी आपल्याला खूप काही करता आलं, तरी आपण त्याबद्दल गर्व आणि फाजील आत्मविश्वास बाळगू नये. सत्यात आपण कितीही वर्षांपासून असलो आणि आपल्यावर कितीही मोठ्या जबाबदाऱ्या असल्या, तरी आपण नेहमी नम्र असलं पाहिजे.