व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

जे एकनिष्ठ नाहीत अशांचं अनुकरण करू नका

जे एकनिष्ठ नाहीत अशांचं अनुकरण करू नका

कोरह, दाथान आणि अबीराम यांनी यहोवाच्या व्यवस्थेविरुद्ध बंड केलं. ते यहोवाला एकनिष्ठ राहिले नाहीत. यहोवाने या बंडखोर लोकांचा आणि त्यांना साथ देणाऱ्‍या लोकांचा नाश केला. (गण १६:२६, २७, ३१-३३) कोणत्या परिस्थितीत आपल्याला यहोवाला एकनिष्ठ राहणं कठीण जाऊ शकतं? अविश्‍वासू लोकांचं अनुकरण करण्यापासून दूर राहण्यासाठी बायबलमधली कोणती उदाहरणं आपल्याला मदत करू शकतात?

ज्यांनी आपली एकनिष्ठता टिकवून ठेवली नाही, त्यांचं अनुकरण करू नका  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • कोणत्या परिस्थितीमुळे निकीच्या एकनिष्ठेची परिक्षा झाली, आणि कोणत्या गोष्टीवर विचार केल्यामुळे तिला एकनिष्ठ राहायला मदत झाली?

  • एका निराश झालेल्या बांधवाला एकनिष्ठ राहणं का अवघड होतं, आणि कोणत्या गोष्टीवर विचार केल्यामुळे त्याला मदत झाली?

  • मंडळीतल्या वडिलांसमोर कोणती परिस्थिती निर्माण झाली, पण कशामुळे ते एकनिष्ठ राहू शकले?

  • कॉलेजमध्ये शिकणाऱ्‍या एका बांधवासमोर कोणत्या गोष्टीचा मोह होता, पण कोणाच्या उदाहरणावर विचार केल्यामुळे त्याला एकनिष्ठ राहता आलं?